Money Making Tricks2026|2026 मध्ये धनवर्षावासाठी तयार व्हा! पैशाचा पाऊस पाडणारे जबरदस्त उपाय!

नमस्कार मित्रांनो!

Money Making Tricks2026 साठी खालील उपाय वाचा:

2026 या वर्षामध्ये तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करा या वर्षी successful होऊन दाखवा.2026 वर्ष आर्थिक दृष्ट्या अनेक राशींसाठी शुभ तर काहींसाठी थोडे आव्हानात्मक असू शकते. पण ज्यांच्या घरात सकारात्मक ऊर्जा, श्रम, नियोजन आणि देवी लक्ष्मीची कृपा असते, त्यांच्याकडे पैशाचा ओघ कधीच थांबत नाही.या लेखात आपण जाणून घेणार आहोत.लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठीचे घरगुती उपाय, धनवाढीसाठीचे आणि 2026 मध्ये आर्थिक प्रगती वेगाने करण्याचे मार्ग.

1) देवी लक्ष्मीची नियमित पूजा :

दररोज किंवा शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी देवीची उपासना केल्याने घरात शांतता, समृद्धी आणि धनप्रवेश वाढतो असे मानले जाते.

  • सकाळी उठल्यावर घरात गोड सुवास पसरवण्यासाठी अगरबत्ती किंवा धूप लावा.
  • लक्ष्मीमूर्ती किंवा फोटोपुढे पांढरी व स्वच्छ फुलं अर्पण करा.
  • शक्य असेल तर शुक्रवारच्या दिवशी खीर, दूध, साखर किंवा पांढरे प्रसाद अर्पण करा.
  • हे उपाय घरात सौम्य कंपन निर्माण करतात व व्यक्तीचा मनोबल वाढवतात.

2) घरामध्ये नेहमी स्वच्छता, शांतता, पूजाविधी असण खुप गरजेच आहे.

लक्ष्मीला अस्वच्छता, गोंधळ आणि अनावश्यक वस्तू बिलकुल आवडत नाहीत.

2026 मध्ये धनवर्षाव हवा असेल, तर पुढील गोष्टी करा:

  • घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा.
  • तुटलेली वस्तू, अनावश्यक कपडे, खराब इलेक्ट्रॉनिक्स घरात साठवू नका.
  • घरातील पूर्व किंवा उत्तर दिशेला पैसे, कागदपत्रे, कॅश बॉक्स ठेवल्यास धनप्रवेश वाढतो.
  • स्वच्छता म्हणजे केवळ दिसणे नव्हे तर energy flow योग्य करणे.

3) सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापुर, मुप किंवा तिळाचा तेलाच दिप लावल्याने घरातील नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतोआणि अखंड लक्ष्मीचा वास होतो.

 दीप प्रज्वलनाची शक्ती – धनाचा ओघ आकर्षित करणारी ऊर्जा संध्याकाळी दररोज तुळशीजवळ किंवा घराच्या देवघरात नसत्या कापसाच्या वातेसह तूपाचा दिवा लावावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक कम्पन वाढतात.या दिवशी केलेले दीपदान अधिक फलदायी ठरत.

4 ) लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी  दररोज 108 वेळा ॐ श्री महालक्ष्म्यै नमः या मंत्राण जप करा. हे केल्याने धनप्रवाह वाढतो. 

मंत्रजप – मन शांत आणि अर्थलाभ वाढवणारा उपाय:

देवी लक्ष्मीची कृपा मिळावी म्हणजे मेहनतही आवश्यकच.

या वर्षी खालील गोष्टींवर लक्ष दिल्यास उत्पन्न वाढू शकते:

  • कौशल्यावर आधारित ऑनलाइन काम (freelancing) सुरू करा
  • शेअर मार्केट, म्युच्युअल फंड व SIP यामध्ये नियमित 
  • घरगुती वस्तूंचा छोटा व्यवसाय
  • डिजिटल मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन सारख्या क्षेत्रात काम
  • लक्षात ठेवा: लक्ष्मी त्यांच्याकडेच जाते जे मेहनत, बुद्धी आणि योग्य आर्थिक निर्णय घेतात.

5) लक्ष्मी पुजनच्या दिवशी घरात झाडु धने, गोमतीचक्र आणुन त्यांची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते.

 घरात ठेवण्यासारख्या शुभ वस्तू – धनसंपत्ती वाढवणारे उपाय.

2026 च्या सुरुवातीपासून खालील वस्तू घरात ठेवल्यास सकारात्मक बदल दिसतात:

  • कोपर्‍यात श्रीमंत्र फ्रेम
  • तिजोरीजवळ गोमती चक्र
  • धनत्रयोदशीला आणलेला नवा झाडू
  • कमलगट्टेची माळ देवघरात
  • घरात तुळस आणि मनी प्लांट
  • ही वस्तू वास्तु दृष्ट्या शुभ मानल्या जातात आणि प्रगतीचे मार्ग उघडतात.

6) शनिदोष किंवा आर्थिक अडथळे असल्यास काय करावे?

काही लोकांना चांगले प्रयत्न करूनही पैसे टिकत नाहीत. याचा अर्थ त्यांच्या कुंडलीत किंवा जीवनशैलीत अडथळे असू शकतात. अशावेळी:

  • शनिवारच्या दिवशी काळ्या गोमातेला तेल दान करा
  • पिपळाच्या झाडाला दिवा लावा
  • वृद्ध व्यक्ती किंवा गरजूंना अन्नदान करा
  • दान केल्याने कर्मदोष हलके होतात आणि धनप्रवेशाचे मार्ग उघडतात.

7) लक्ष्मीप्रसाद – घरातील पैशाचा प्रवाह सुधारतो

घरातील वाद, गैरसमज, नकारात्मक चर्चा हे पैशाचा मार्ग बंद करतात.

2026 मध्ये घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी:

  • एकत्र जेवण करा
  • भांडण टाळा
  • कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा आदर करा
  • जिथे प्रेम व सौहार्द असते, तिथे लक्ष्मीचा वास असतो.

8 ) शुक्रवारी पांढरे वस्त्र घालून, महालक्ष्मीला पांढऱ्या रंगाची मिठाईचा नैवेद्य करावा कनकधारा स्त्रोत्राचा पाठ करावा. लक्ष्मी प्रसन्न होते.

पांढरा रंग म्हणजे शांती, स्वच्छता आणि सकारात्मकता.देवीसमोर हा रंग शांत मन घेऊन जाण्याचा संदेश देतो.
पूजा करताना विचार दिशाहीन न होता लक्ष देवीवर केंद्रीत राहायला मदत होतेश्री सूक्त आणि कनकधारा स्तोत्र हे दोन्हीही खूप जास्त महत्त्वाचे आहेत. शक्य असेल तेवढी याची वाचन करा. तुमचे जीवनात हमेशा प्रगती होईल..

9) काचेच्या ग्लासमध्ये एक तेजपत्ता, एक दालचिनीचा तुकडा, थोड गंगाजल, थोड शुद्ध पाणी घरच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावे आणि दर आठ दिवसांनी पाणी बदलावे. हे पुजन शुक्रवारी करावे.

त्या पाण्याचा थोडा शिंपड घरात करा, याने शांतता आणि सकारात्मकता वाढते असे मानले जाते.देवघरामध्ये जेवढे महत्त्वाचे गंगाजल आहे त्याप्रमाणे या जलालाही महत्त्व आहे.

Dattjayanti-vishesh-muhurt-2025|दत्तजयंती विशेष मुहूर्त 2025 |दत्तजयंती विशेष मुहूर्त 2025 

Leave a Comment