Best Amavasya Remedies| अमावस्येचे 10 शक्तिशाली उपाय | नकारात्मकता हटवा आणि धनलाभ वाढवा.अमावस्येला करावयाचे उपाय:
Best Amavasya Remedies| अमावस्येचे 10 शक्तिशाली उपाय | नकारात्मकता हटवा आणि धनलाभ वाढवा.अमावस्या म्हणजे तो दिवस ज्या दिवशी चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो. जो की दिसत नाही हे आपण सगळे जाणतो. पूर्वीचे लोक अमावस्या म्हणजे काळा दिवस असतो या दिवशी चंद्र नसल्यामुळे पूर्णपणे काळोख पसरलेला दिसतो असे म्हणायचे. भारतीय परंपरेनुसार हा दिवस ऊर्जा युक्त आणि अध्यात्मिक परिवर्तनाचा दिवस मानला जातो. अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय, प्रार्थना आणि साधना इतर दिवसांपेक्षा अनेक पटींनी अधिक फलदायी मानले जाते. या दिवशी वातावरणात येत असणारी ऊर्जा शांत असते .म्हणून मनातील इच्छा,अडथळे,पैसा, नकारात्मकता यावर प्रभावी उपाय केले जातात. या दिवशी काय करावे? आणि कोणती उपाय केल्याने घरात सुख पैसा आणि शांततेचा प्रवाह वाढतो?
1) घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपाय:
अमावस्या म्हणजे असा दिवस ज्या दिवशी घरात नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात सक्रिय होते असे मानले जाते. म्हणून या दिवशी घर शुद्ध करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
- गंगाजल शिंपडणे
- सकाळी किंवा सायंकाळी घरच्या चारही कोपऱ्यात गंगाजल शिडकावे.
- हे केल्याने वातावरण शुद्ध आणि शांत होते.
2) तिळाच्या तेलाचा दिवा लावावा:
अमावस्येच्या रात्री तिळाच्या तेलाचा दिवा लावणे खूप महत्त्वाचे आहे हा दिवा तुमच्या घरामध्ये सकारात्मकता घेऊन येईल. अमावस्येच्या दिवशी हा दिवा मुख्य दरवाजाजवळ किंवा देवघरात लावावा. हा दिवा दर अमावस्येला लावल्याने अडथळे दूर होतात आणि घरात शांतता निर्माण होते.
3) पितृतर्पण करणे आवश्यक:
अमावस्या हा दिवसपितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून पितृतर्पण करावे. अमावस्येच्या दिवशी बिन मिठाचा भात बनवा. त्यात काळे तीळ, तूप, साखर टाकून त्याची तीन घास करा आणि केळीच्या पानावर दक्षिण दिशेला नैवेद्य ठेवा. नैवेद्य अर्पण करून पितरांची क्षमा मागून आशीर्वाद घ्या. एका तांब्यामध्ये पाणी घेऊन ते पितराच्या नावाने झाडाला घाला .
4) कापूर किंवा धुपाचा घरामध्ये दूर करा:
सायंकाळी घरामध्ये कपूर, लवंग, पिवळी मोहरी किंवा गुगुळ यांचा धूप करून धूर करा आणि घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात फिरवा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल आणि मनामध्ये शांत विचार करा की घरामध्ये एक सकारात्मक शक्तीचा अनुभव होत आहे. नकारात्मकता घराबाहेर जात आहे.
5) दान करणे ज्यामुळे मन स्थिर होऊन शांती मिळते:
अमावस्येच्या दिवशी दान पुण्य करणे यामुळे मनाला एक वेगळाच संतोष मिळतो. जो माणूस जीवनात जास्त दान पुण्य करतो तो सर्वात मनाने सुखी समाधानी असतो.त्याला जीवनात काहीच कमी पडत नाही.
दान कशाचे करावे?
काळे तीळ
कपडे
अन्न
चप्पल
गरजू लोकांना मदत
दान केल्याने मनातील अहंकार कमी होतो आणि जीवनात नवी ऊर्जा येते.
6) लक्ष्मीपूजन आणि मंत्रजप:
लक्ष्मीची विशेष कृपा मिळण्याचे वेळ अमावस्या असते असे म्हणतात. आपण दिवाळी मध्ये लक्ष्मीपूजन हे अमावस्येच्या दिवशी साजरी करतो. पण अमावस्येच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीची साधे पूजन करू शकता.
दिवा लावला फुलं अर्पण करा आणि मंत्र जाप करा.
शुभमंत्र: ” ॐ श्री महालक्ष्मी नमः”
या मंत्राचा जप 108 वेळा केल्याने धनप्राप्ती,आर्थिक प्रगती आणि घरातील समृद्धी वाढते. आपण जेवढे मनातून देवाचं ध्यान ,नामस्मरण, जप करतो तेवढा आपल्याला फळ खूप जास्त मिळत. तुमची प्रगती कोणी थांबू शकत नाही.
7) तुळशीला पाणी घालणे:
अमावस्येच्या दिवशी झाडांना पाणी देणे हे शुभ मानले गेले आहे. हिरवळ घरात सकारात्मकता आणते आणि झाडांची वाढ ही छान होते. तुळशीला पाणी घालने विशेषतः महत्त्वाचे आहे. आपल्या घरात असणारी तुळस आपल्या घरातील वातावरणाची माहिती देत असते. जर घरातील तुळस छान वाढलेली, हिरवीगार आणि दाट दिसत असेल तर आपल्या घरात नेहमी सकारात्मकता आणि आनंदाचे वातावरण आहे असे समजते. या उलट जर तुळस वाळून गेली असेल आणि पाणी गळून गेले असतील तर समजा की नकारात्मकता वातावरणात जास्त वाढली आहे.
8) ऊर्जा शुद्ध होण्यासाठी घरामध्ये साफसफाई करा:
घरामध्ये अमावस्येच्या सकाळी साफसफाई करा घरातील जाळ्या काढून टाका. सर्व घर स्वच्छ झाला पाहिजे घरातील नकारात्मकता बाहेर टाकून द्या.खराब झालेल्या वस्तू फेकून द्या. अमावस्येच्या दिवशी घर मिठाच्या पाण्याने पुसून घ्या. यामुळे वाईट शक्ती,नकारात्मकता निघून जाते.
9) काळे तीळ वाहत्या पाण्यात टाकणे:
काळे तीळ अमावस्येला जर तुम्ही पाण्यात प्रवाहित केले तर हा उपाय नजरेचा त्रास, अडथळे, नशीब न साथ देणे असे प्रश्न दूर करतो. सात काळे उडीद वाहत्या पाण्यात सोडा हा उपाय अडथळे दूर करण्यास प्राचीन काळापासून केला जात आहे.
10) शांत प्रार्थना मन स्थिर:
तुम्ही जर या दिवशी रात्री पाच ते दहा मिनिटे बसून शांत प्रार्थना केली तर तुमच्या मनातील गोंधळ कमी होऊन तुम्हाला हलकेपणा जाणवेल ध्यान धारणा केल्याने तुमचे सर्व कामे सुरळीत पार पडतील.
निष्कर्ष:
अमावस्या हा दिवस काही लोकांना भीतीचा वाटत असला तरी हा भीतीचा दिवस नसून एक सकारात्मक बदल आणि ऊर्जादायी दिवस आहे.
घरातील शांतता, आर्थिक प्रगती आणि चांगली ऊर्जा हवी असेल तर हे उपाय नक्की करून बघा.
2026 Good news for this zodiac sign|2026मध्ये या राशींना मिळेल गुड न्यूज
http://2026-good-news-for-this-zodiac-sign