Dattjayanti-vishesh-muhurt-2025|दत्तजयंती विशेष मुहूर्त 2025 

श्री गुरुदेव दत्त !

Dattjayanti-vishesh-muhurt-2025| दत्तजयंती विशेष मुहूर्त 2025 
दत्तजयंती हा दिवस मार्गशीष-पौर्णिमा या दिवशी साजरा करतात .यामागील कारण म्हणजे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती (ब्रम्हा, विष्णु, महेश) अवतार भगवान दत्तात्रय यांचा जन्म दिवस म्हणून या दिवसाला खुप महत्त्व आहे. या पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी दत्त असतात . त्या त्या ठिकाणी भक्त दत्त मंदिरात जाऊन ते मनोभावे व्रत, पुजा पार पड़तात. दत्ताजयंती ची वाट लोक पूर्ण वर्षभर बघतात. हा दिवस हिंदू संस्कृतीत पवित्र आणि अनन्य शुभ मानला जातो.यादिवशी दत्तभक्त नामस्मरण, भगवान दत्तची, आरती, माळांची पुजा, जप, ध्यान करतात.सर्व इच्छा पूर्ण होण्याचा हा दिवस असतो. या दिवशी केलेले जप, दान, व्रत ,पुजन मनाला स्थैर्य, बुद्धीला प्रकाश आणि घराला सकारात्मकता ऊर्जा देतात असे मानले जाते .

दत्तात्रेयांचा मुख्य संदेश म्हणजे ज्ञान, भक्ती आणि कर्म या तिन्हींचा समतोल. त्यांच्या जीवनातून आपल्याला निसर्गातील प्रत्येक गोष्टीतून शिकण्याची प्रेरणा मिळते. दत्तात्रेयांनी चोवीस गुरूंमधून मिळवलेले ज्ञान आजही लोकांच्या आध्यात्मिक जीवनाला दिशा देते. म्हणूनच दत्त जयंतीला ध्यान, जप, व्रत आणि सत्संग यांच्या माध्यमातून मनाला पवित्र करण्याचा दिवस मानला जातो.

या दिवशी दत्तगुरुंच्या पूजा, आरती, गुरुचरित्राचे पारायण, गजर, दत्तमाला, व्रत यांचे विशेष महत्त्व असते. असे मानले जाते की दत्त जयंतीच्या दिवशी केलेले जप–तप, दान–धर्म आणि प्रार्थना सामान्य दिवसांच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक फलदायी होते.

दत्त जयंती विशेष मुहूर्त(2025)

  • तारीख :मार्गशीष पौर्णिमा
  • ब्रह्म मुहूर्त :सूर्योदयापूर्वी अंदाजे ४:३० ते ६:००
  • सकाळ ०७:०० ते १०:३०
  • मध्यान्ह : ११:३० ते ०१:३०
  • सायंकाळ (दीपपूजन): सूर्यास्तानंतर ०६:३० ते ०८:३०
  • जप अनुष्ठानासाठी उत्तम वेळ: पौर्णिमा तिथे जितका वेळ आहे .

दत्तजयंतीच्या दिवशी विशेष मुहूर्तापेक्षा भक्तीभाव महत्वाचा मानला जातो आणि पौर्णिमा तिथी चालु असताना पुजा करणे सर्वश्रेष्ठ मानले जाते.

दत्तजयंती पूजनासाठी साहित्य खालीलप्रमाणे :

  • स्वच्छ आसन
  • दत्तात्रेय देवाचा फोटो
  • तांब्याचा कलश
  • अबीर-गुलाल
  • कुंकू, हळद
  • अक्षदा
  • पंचामृत 
  • तुळस पाने
  • गंगाजल
  • फूले
  • गंध (चंदन
  • धूप, अगरबत्ती
  • दिप
  • कापूर
  • नैवेद्य (परंपरेप्रमाणे)
  • फुलमाळ
  • पान, सुपारी

दत्तजयंतीचे महत्त्व :

  दत्तजयंती हा सण एक अनन्य साधारण महत्व असणारा पवित्र दिवस आहे.यादिवशी त्रिमूर्ती दत्तात्रय 

 देवाचा जन्म झाला आहे .हे  आपल्याला तर माहितच आहे.

भगवान दत्त म्हणजे  त्रिदेवांचा ब्रम्हा, विष्णु ,महेश यांचा एक अवतार आहे . यांचे पुजन करून आशीर्वाद घेण म्हणजे ” सकारात्मकता आणि शुध्दता आणणे होय.

* तसेच खाली काही महत्व स्पष्ट केले आहे:

 1) त्रिदेवांचे आशीर्वाद मिळण्याचा दिवस :

दत्तजयंतीला जर आपण दत्तात्रेयाचे पुजन केल्याने सुष्टीकर्ता (ब्रम्हा), पालनकरता (विष्णु), संहारकर्ता (शिव) यांचा आर्शिवाद मिळतो.दत्तात्रेयाचा आशीर्वाद मिळण हे खूप नशिबाचं काम आहे. या दिवशी गुरुचरित्राचा पाठ केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात. कोणाला नोकरी संबंधित अडचणी असतील, कोणाच्या लग्न जमत नसेल, बाहेरील बाधा अनपेक्षित तोटा होत असेल, तर गुरुचरित्र नक्की वाचा. तुम्हाला होणारा लाभ तुमचं जेवण बदलून टाकेल. तुम्हालाही गुरुदेवांचा अनुभव येईल त्या माध्यमातून तुम्ही जीवनात सकारात्मक बदल घडून आणताल.

2) अध्यात्माकडे नेणारा दिवस: 

दत्तात्रेयाचे ऊर्जा मन शुद्ध करते आणि व्यक्तीला चांगले विचार, स्थिर मन,शांत बुद्धी,सकारात्मकता आणण्यास मदत करते.दत्त जयंती हा दिवस इतका आध्यात्मिक दृष्ट शुभ दिवस आहे .की या दिवशी तुम्ही स्वतःला अध्यात्मात विलीन करून घ्या.जीवनात कसलीही चिंता राहणार नाही.

3) भक्तांची संकट, पाप,नजर दोष नष्ट करण्याचा दिवस: 

  • पितृदोष 
  • नजरदोष 
  • नकारात्मकता 
  • वाईट ग्रहांचा परिणाम 
  • हे सर्व कमी होतं दत्त पूजन केल्याने.

4)कुटुंबात एकात्मता आनंद वाढतो.

दत्त जयंतीला सर्व परिवार मिळून मनोभावे पूजा केल्याने सदस्यांमध्ये एकात्मता आणि आनंद वाटतो ते लोक सुखी समाधानाने जगतात.कुटुंबात जर कसलाही द्वेष असेल, तर या दिवशी तुम्ही गुरुचरित्र नक्की वाचा तुम्ही परिवारात सुखाचा अनुभव कराल. 

5) गुरुतत्त्व शक्तीचा दिवस: 

भगवान दत्त हे जगद्गुरु मानले जातात.दत्त जयंतीचा दिवस मनातील अज्ञान दूर करून मार्गदर्शन ,योग्य निर्णय व चांगले संस्कार यांची प्राप्ती करून देणारा दिवस असतो.गुरूंच्या शक्तींचा तुम्हाला अजून अंदाज नाही आहे .ज्या लोकांना याचा अनुभव आला आहे. ते आपल्या जीवनात एका चांगल्या मार्गाला जाऊन सुखाने आनंद व्यतीत करत आहेत.

दत्त जयंतीची पारंपरिक पूजा:

  1. सकाळी स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे कपडे परिधान करावेत.
  2. दत्तगुरूंच्या प्रतिमेवर पंचामृत अभिषेक करावा.
  3. फुले, बेलपत्र, हळद-कुंकू, नैवेद्य अर्पण करावे.
  4. “दत्तात्रेय स्तोत्र, गुरुचरित्र पारायण, किंवा सप्तशती पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
  5. दिवसा दानधर्म—अन्नदान, वस्त्रदान—करल्यास पुण्य वाढते.
निष्कर्ष:
दत्तजयंतीला दत्तपूजन करणारे लोक जीवनात सुखी समाधानी असतात. हिंदू संस्कृतीमध्ये जेवढे पूजन विधी आहेत ते योग्य पद्धतीने पार पाडल्यास जीवनात कसलीही कमी पडत नाही.
Money Making Tricks2026|2026 मध्ये धनवर्षावासाठी तयार व्हा! पैशाचा पाऊस पाडणारे जबरदस्त उपाय!

Leave a Comment